गीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा
स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले, साजणा

गीतराणी स्वये तू, तूच माझी, माझी भावना
आस तूच या स्वरांना, रंग मैफलीचा, साजणी, तूच ना

गीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना

अशा सहवासी, जीव सुखवासी
कुणी जन्म गुंफिले सांग ना, सांग ना

गीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना

कुहू कुहू बोले, कोयल बोले, रे
जणू तुझे माझे, राजा
तिने सोनेरी सोनेरी गीत गाइले, साजणा

गीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना

तुझे माझे घर सुखाचा संसार
दीठ संसारा न लागो, साजणा

गीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - वर्षा भोसले, सुरेश वाडकर
चित्रपट - संसार (१९८०)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.