अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

स्वप्न सरावे आणि उरावी
काळी काजळरात
उरावी मागे काळी काजळरात

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

तुफान दर्या, चंदेरि रात
काठाला भिडली फेसाळ लाट
वादळ भरलंय्‌ बाहेर, आत
हातात दे ग, तुझाच हात
पुरे दुरावा, पुरे सजा
तुझाच मी, ग, तुझा तुझा !

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

इंद्रधनूचे रंग विरावे
संध्येच्या तिमिरात
विरावे कैसे संध्येच्या तिमिरात
विपल झाली प्रीतिपूजा
दूर गेला नाथ माझा
कापत राहे ज्योती
वादळत्या प्रहरात
जपावी कैशी वादळत्या प्रहरात ?

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - बाळ पार्टे
स्वर - आशा भोसले, महेंद्र कपूर
चित्रपट - मंगळसूत्र (१९६८)
For the printable version of this song, click here.