कोण अससि तू न कळे मजला ॥
तू गंगेची अथांग शुचिता
की जननीची मायाममता ? ॥

भाविकतेची मंगलगाथा
उदार चरिता अमर देवता
नवा जन्म तू मजला दिधला
काय वदू मी नकळे तुजला ॥
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वर - पं. राम मराठे
नाटक - मंदारमाला (१९६३)
राग - जोगकंस (नादवेध)
ताल - त्रिताल
For the printable version of this song, click here.