गुरुने दिला
ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू
हा पुढे वारसा
पिता बंधु स्नेही
तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी
सावली
तुम्ही सूर्य
आम्हा दिला
कवडसा !
जिथे काल अंकूर
बीजातले
तिथे आज वेलीवरी
ही फुले
फलद्रुप हा
वृक्ष व्हावा
तसा !
शिकू धीरता
शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे
नम्रता
मनी ध्यास हा
एक लागो असा
!
जरी दुष्ट कोणी
करू शासन
गुणी सज्जनांचे
करू पालन
मनी मानसी हाच
आहे ठसा !
तुझी त्याग-सेवा,
फळा ये अशी
तुझी कीर्ति
राहील दाहीदिशी
अगा पुण्यवंता,
भल्या माणसा
!
|