इथे मिळाली
सागर-सरिता,
ही प्रितीची
एकरूपता
इथे मिळाली
!
कमलफुलांचे
सुगंध सिंचन,
की भ्रमराला
गोड निमंत्रण
मिटे पाकळी
मीलन घडता,
ही प्रितीची
एकरूपता
इथे मिळाली
!
या धरणीची हाक
ऐकली, निळे
गगन हे झुकले
खाली
क्षितिजावरही
प्रेम सांगता,
ही प्रितीची
एकरूपता
इथे मिळाली
!
बांधु अपुले
घरकुल चिमणे,
तुझियासाठी
माझे जगणे
मरणा येईल चिरंजीविता,
ही प्रितीची
एकरूपता
इथे मिळाली
!
|