आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई ?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई ?

तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई ?

रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई ?

चुकलो असेन मी गे, म्हणतो तुला मी आई
चुकली ग तू परी का, होऊन माझी आई ?
 
 
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पुत्र व्हावा ऐसा (१९६०)
For the printable version of this song, click here.