काय करू मी
ते सांगा तुम्ही
पांडुरंगा
जगा आकळेना
कोडे, तुम्हां
घालतो साकडे
आग मना अवघ्या
अंगा, उभा पेटलो
श्रीरंगा
बाप गेला, आई
मेली, लोचने
ना पाणावली
विवेकासी नाही
जागा, आज भ्यायलो
प्रसंगा
शिष्य मागतो
समाधी, पुत्र
मरे बापा आधी
काय म्हणावे
भोगा, उलट वाहू
पाहे गंगा
|