हरि उच्चारणीं अनंत पापराशि ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥

तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥१॥

हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथे ॥२॥

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥३॥
 
 
रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - ???
स्वर - आशा भोसले
For the printable version of this song, click here.