त्या तुझिया चिंतनात
मन माझे गुंतु दे
गीताच्या एकसरी
भावफुले गुंफु दे

श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे

भाव एक नवनवा
गंध धुंद करि जीवा
जीवशीव संगतीत, मन कलिका उमलू दे

छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिनरजनी
गीत तुझे आठवून तुजसाठी गाउ दे
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - उषा मंगेशकर
For the printable version of this song, click here.