नाही कधी का
तुम्हास म्हटलं
दोष ना द्यावा
फुका
अन् राया मला,
पावसात नेऊ
नका !
लई गार हा झोंबे
वारा
अंगावरती पडती
धारा
वाटेत कुठेही
नाही निवारा
भवतील ओल्या
चुका
अन् राया मला,
पावसात नेऊ
नका !
खबूतरागत हतंच
बसू या
उबदारसं गोड
बोलू या
खुळ्या मिठीतच
खुळे होऊ या
लावून घेऊ खिडक्या
दारं
पाऊस होईल मुका
अन् राया मला,
पावसात नेऊ
नका !
|