काय ग सखू ?
बोला दाजिबा
!
काय ग सखू,
बोलू का नगू
,
घडिभर जरा थांबशील
का ?
गोड गोड माझ्याशी
बोलशील का ?
काय सांगू बाई,
लई मला घाई
दाजिबा बोलायला
येळच नाही !
येळच नाही ?
दाजिबा थांबायला
येळच नाही !
डोईवर घेऊन
तू चाललीस काई
?
डोईवर पाटी,
पाटीत भाकरी,
भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध
हाय गाईचं,
घेता का दाजिबा
वाईचं ?
काय ग सखू,
रागावू नगू,
घडीभर जरा थांबशील
का ?
थांबशील का
ग, जातीस कुठं
तू सांगशील
का ?
रानाच्या वाटं
घेताय भेट
दाजिबा तुमचं
वागणंच खोटं
वागणंच खोटं
?
पहाटेच्या पारी
तू चाललीस कुठं
?
पहाटेच्या पारी,
घेऊन न्यारी,
बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या
बागात, येऊ
नका दजिबा रागात
काय ग सखू,
घाबरू नगू
घडीभर जरा थांबशील
का ?
मनात काय तुझ्या
सांगशील का
?
सांगू कशी मी
कस्कसं होतं
मनात माझ्या
भलतंच येतं
काय ग सखू तुझ्या
मनात येतं ?
दुखतंय कुठं
कळंना नीट,
लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला
माहीत, जायाचं
का आंबराईत
?
चल चल सखू,
चल ग सखू
जावा दाजिबा,
अहो जावा दजिबा
!
|