घट डोईवर घट कमरेवर,
सोडी पदरा, नंदलाला, नंदलाला रे

कुणीतरी येईल अवचित पाहिल
जाता जाता आगहि लाविल,
सर्व सुखाच्या संसारला, नंदलाला रे

हलता कलता, घट हिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला, नंदलाला रे

केलीस खोडी, पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसुनी तूही हो बाजूला, नंदलाला रे
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.