घे झाकून मुख
हे चंद्रमुखी
प्रीतिस लागे
दृष्ट सखी
गंध प्रीतिचा
असतो हळवा
टाळ वादळे दुष्ट
सखी
चंद्र असू दे
अर्धा मुर्धा
तिमिरी प्रीती
पुष्ट सखी
अमिट सूर जरि
उरी दटले
मीट आपुले ओष्ठ
सखी
शब्दवाचुन कळे
प्रीतिला
डोळ्यांतिल
उद्दिष्ट सखी
प्रीत असो,
पण रीत असू
दे
प्रीतीवर जग
रुष्ट सखी
सरळ संथ हा
पंथ जनांचा
प्रेमिक हे
पथभ्रष्ट सखी
|