माझिया नयनांच्या कोंदणी
उमलते शुक्राची चांदणी

तम विरते रात्र सरते
पहाट-वारे झुळझुळते
प्राजक्ताचे तरु मोहरते
हृदयीच्या अंगणी

प्रहर पहिला आविरत येतो
भूपाळीचे स्वर गुणगुणतो
अरुण मनाचा हर्ष रंगतो
पूर्वेच्या लोचनी

दव बिंबातुनी क्षण सोन्याचा
उजळत राही जीव जिवाचा
स्वर्ग हासतो वसुंधरेचा
किरणा किरणातुनी
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - कन्यादान (१९६०)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.