माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सापडलो एकामेका
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा मोडिली माझी माया
मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥
त्वा मज मोकलिले विदेही
मी तुज घातले हृदयी ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा
सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥
रचना
-
संत नामदेव
संगीत
-
राम फाटक
स्वर
-
पं. भीमसेन जोशी
राग
-
बागेश्री
(नादवेध)