कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥

रामाविण जीव व्याकुळ होतो
सुचत नाहीं काम ॥२॥

रामाविण मज चैन पडेना
नाहीं जीवासी आराम ॥३॥

एका जनार्दनीं पाहुनी डोळा
स्वरूप तुझें घन:श्याम ॥४॥
 
 
रचना - संत एकनाथ
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - पं. भीमसेन जोशी
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.