दिनरात तुला
मी किती स्मरू
जन हसती मला
मी काय करू
?
भरल्या नयनी
हात जोडुनी
सांगु कुणाला
काय म्हणोनी
?
काहुर मनिचे
येता दाटुनि
माझि मला मी
कशी सावरू ?
कितीकदा मज
बघुनी कष्टी
जे येती ते
वेडे म्हणती
मुग्ध कळीपरि
मिटल्या ओठी
ध्यानि मनी
मी अशि किती
झुरू ?
निराधार मी
धुळीस मिळुनी
गेले वेढुनि
चहु बाजूनी
खिन्न जगी या
बंदीवान मी
तुला नव्हे
तर कुणा विचारू
?
|