लाजवी मला हे नाव गडे
अन्‌ नयनी मनोहर प्रीत दडे

नजरानजरी हसण्यामधली
क्षण ओळख ती क्षणात जडली
प्रीत सुगंधित कळी कोवळी
आली उधळीत गंधसडे

अवखळ माझे डोळे दोन्ही
’लाजू नका ग’ म्हणती हसुनी
भाव मनीचे हसरे बघुनी
हसु का रुसू ? प्रश्न पडे

जगताहुन ही अगदी निराळी
धुंद मनाची आशा भोळी
ठरल्या जागी ठरल्या वेळी
पाऊल माझे अचुक पडे
 
 
गीत - रमेश आणावकर
संगीत - वसंत प्रभू
स्वर - सुमन कल्याणपूर
For the printable version of this song, click here.