बोलून प्रेमबोल,
तू लाविलास
छंद
लावून छंद वेडा,
केलेस विश्व
धुंद
धुंदित त्या
क्षणांच्या,
युग एक हे बुडाले
घरटे करोनि
चिमणे, मन-पाखरू
उडाले
वाऱ्यावरी वरात,
पथ हा तया अरुंद
प्रीतीत रंगलेली,
विरली उषा प्रभाती
छंदात हरवल्या
त्या, मधुपुनव-चांदराती
निशिगंध मात्र
देई, मन-भाबडा
सुगंध
|