कशि गौळण राधा बावरली !

जलभरणा यमुनेला गेली
शीळ खुणेची अवचित आली
रोमांचित काया थरथरली !

कृष्ण सावळा गोरी राधा
कृष्णसख्याची जडली बाधा
कृष्णच नेत्री, कृष्णच गात्री
कृष्णात राधिका विरघळली !

लाजेचीही वसने फिटली
लोकांमधुनी राधा उठली
राधा-मोहन होता मीलन
हरिकांति तनूवर पांघरली !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - राम कदम
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - एक गाव बारा भानगडी (१९६८)
For the printable version of this song, click here.