पक्षिणी प्रभाति चारियासी जाये
पिलुवाट पाहे उपवासी ॥१॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस
चरण रात्रंदिवस चिंततसे ॥२॥

तान्हे वस्त्र घरी बांधिलेस देवा
तया हृदयी ठावा माऊलीचा ॥३॥

नामा म्हणे देवा तू माझा सोयरा
झणि मज अव्हेरा अनाथ नाथा ॥४॥
 
 
रचना - संत नामदेव
संगीत - यशवंत देव
स्वर - सुमन कल्याणपूर
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.