या नव्या सुखाला काय म्हणू
हे भाग्य नव्हे, सौभाग्य जणू

नटली शोभा नव्या घराची
ठेव सासरी माहेराची
अखंड माया संसाराची
गोफ लागले विणू

फांदीवरती चिमणा चिमणी
खुणावती मजला रे घरट्यामधुनी
एकांतीचे सुख पाहुनी
थरथरली ही तनू

या राजाची मी तर राणी
जीव फुलविते मोरावाणी
आनंदाचे आळवित गाणे
किती किती मी शिणू
 
 
गीत - ???
संगीत - ???
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - काळी बायको (१९७०)
For the printable version of this song, click here.