एक एक पाउल
उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि
जाऊ नियतीच्या
भयाने !
पंख नाहि दिधले
मनुजा जरि ईश्वराने
खंत काय धरिली
त्याचि कधी
मानवाने
अधांतरि उडति
त्याच्या यशाचि
विमाने
नको बावरूनि
जाऊ नियतीच्या
भयाने !
सूर्य चंद्र
नसता गगनि काजळे
धरित्री
प्रकाशास कोंडी
मानव वीज काचपात्री
तारकास लाजविते
ते दीप शामदाने
नको बावरूनि
जाऊ नियतीच्या
भयाने !
तुझ्या मागुति
मी यावे असे
स्वप्न होते
पुढे होउनिया
आता तुला हात
देते
ऊठ चाल बघसि
का रे असा विस्मयाने
नको बावरूनि
जाऊ नियतीच्या
भयाने !
|