चंदनाचे हात पायही चंदन ।
परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाही पोटीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून ।
पाहता अवगुण मिळेचि ना ॥३॥
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
यशवंत देव
स्वर
-
सुमन कल्याणपूर