आज गोकुळात
रंग खेळतो हरी;
राधिके, जरा
जपून जा तुझ्या
घरी !
तो चटोर चित्तचोर
वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल
रंग टाकतो
रंगवून रंगुनी
गुलाल फासतो
सांगते अजूनही
तुला परोपरी
!
सांग श्यामसुंदरास
काय जाहले ?
रंग टाकल्याविना
कुणा न सोडिले:
ज्यास त्यास
रंग रंग रंग
लागले !
एकटीच वाचशील
काय तू तरी
!
त्या तिथे अनंगरास
रंगला;
गोपगोपिकांसवे
मुकुंद दंगला;
तो पहा मृदुंग
मंजिऱ्यात वाजला
हाय ! वाजली
फिरून तीच बासरी
!
|