देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर

मधुर फळांवर मोहरलेली
पर्णांतरी ही पल्लवलेली
चुंबीत राहीन लज्जीत लाली
तुझ्यासवे मी वृक्षलतेवर

तव स्पर्शाने पुष्पकवीणा
भाव मधुर ही सुस्वरताना
हास्य सुगंधीत सख्या मोहना
उधळीत राहू गीत फुलावर

दमयंतीच्या प्रेमळ दूता
पंख तुझे ते मला लाभता
प्रिया भेटण्या ही आतुरता
घेत भरारी बघ वायुवर
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - मीना मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - माणसाला पंख असतात (१९६०)
For the printable version of this song, click here.