आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात
 
 
गीत - अनंत काणेकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - शांता हुबळीकर
चित्रपट - माणूस (१९३९)
For the printable version of this song, click here.