कन्या सासु-याशीं जाये ।
मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा
केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळे ॥४॥
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
श्रीनिवास खळे
स्वर
-
लता मंगेशकर