माझ्याकडं बघून,
डोळा बारीक
करून
पाहुणा गालात
हसतोय ग,
लई बाई लबाड
दिसतोय ग !
उगाच मिशिला
देतुया पीळ,
तोंडानं हलकेच
घालतुया शीळ
पुन्हा पुन्हा
बघुन, छाती
पुढे काढून,
उगाच ऐटीत चालतोय
ग,
लई बाई लबाड
दिसतोय ग !
सकाळच्या पारी
पाण्याला जाता
उभा राहून ग
रोखतुया वाटा
जरतारी फेटा
बांधुन मोठा
रुबाब अपुला
दावतोय ग,
लई बाई लबाड
दिसतोय ग !
पाण्यानं भरुन
घेता ग घागर
हिसळून पाणी
भिजतुया पदर
मदनाचा बोका
घेतुया झोका
मलाच कोड्यात
घालतोय ग,
लई बाई लबाड
दिसतोय ग !
|