मथुरेला कृष्ण निघाला
कंस भेटीला, दु:ख काळजाला
साऱ्या गोकुळाला !

यशोदेस वाटे चिंता
दृष्ट झाली या भगवंता
कंस तुला लाविल बाळा
दुष्ट सापळा, दु:ख काळजाला
साऱ्या गोकुळाला !

जवळ जाऊनिया माता
लडिवाळ कुरवाळिता
माऊलिस समजावितो
श्याम सावळा, दु:ख काळजाला
साऱ्या गोकुळाला !
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - जयवंत कुलकर्णी
चित्रपट - धन्य ते संताजी धनाजी (१९६८)
For the printable version of this song, click here.