सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥१॥

तुळसी हार गळा, कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥२॥

मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.