सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून !

मनी नकार दाटले, हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून !

कळी कळी वेचताना अशी संध्याकाळ झाली
घराकडे वळणारी वाट अंधारी बुडाली
नामरूपहीन वृक्ष उभे भिती पांघरून !

आत बाहेर घेरून आल्या घनदाट छाया
चुकलेल्या गुरापरी जीव लागे हंबराया
कळी कळी वेचताना वेळ गेलीसे टळून !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - गारंबीचा बापू (१९८०)
For the printable version of this song, click here.