चुकचुकली पाल
एक कालचक्र
क्षण चुकले
नकळत या रात्रीला
मी माझे दिन
विकले
रंग तुझे स्वप्नमयी
ल्यालेली ती
पहाट
धुक्यामधून
मी तुझी शोधियली
वाट वाट
परि दिशेस पुन्हा
पुन्हा वळण
नवे का फुटले
अशी हरवले तशी
मलाच मी अनोळखी
इथे तिथे दवातही
तुझीच मूर्त
सारखी
गीतातील सूर
असे का मधेच
पण तुटले
तुजवाचून दूर
दूर मी अशीच
राहणार
ही अशीच तव
छाया पण मागे
धावणार
सावल्यात साऱ्या,
या चित्र असे
मम कुठले
|