बिगी बिगी चाल ग, चाल ग मर्दिनी
वाट बघत असेल घरधनी न्यारीच्या ग पाई
पाया म्होरं पळतंय मन, झाली त्याला घाई

अशी कशी ओढ बाई असं कसं वेड ग, विचारू कुणाला?
मनाला मनाला ग, मनाला मनाला !

प्रितीनं हाक ही दिली, साद घातली
कुणाला कुणाला ? ..... मनाला मनाला ग मनाला !

कळिला वारा फुंकर घाली झुळुझुळु का झुळुझ्ळु
अन्‌ पदर पाकळी उमलू लागे हळुहळु का हळुहळु
साजणा सांग ना
ही किमया असते अशी जादु ही कशी, फुलविते मदनाला

खट्याळ पाणी गातंय्‌ गाणी गुणुगुणु का गुणुगुणु
अन्‌ लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणु
सजणा सांग ना
या नदीला सागर दिसं लागलं पिसं पाण्याला, खळखळत्या पाण्याला
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट - लक्ष्मी (१९७८)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.