गणराज रंगि
नाचतो, नाचतो,
पायि घाग-या
करिती रुणुझुणु
नाद स्वर्गि
पोचतो !
कटि पीतांबर
कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनासि
करि
तुंदिल तनु
तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो
!
नारद तुंबरु
करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो
तालहि रंगुन
मृदंग धिमि
वाजतो !
देवसभा घनदाट
बैसली
नृत्यगायने
मने हर्षली
गौरीसंगे स्वये
सदशिव
शिशुकौतुक पाहतो
!
|