चंदनाच्या पलंगी
शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी
गरम लोकरी शाल
पर झोप नाही
आली जागरण झालं
काल
रंग महाली उब
असून का काटा
फुलतोय नवा
ग बाई बाई झोंबतो
गारवा !
अंग नाजूक ग
मला रुतली उशी
आली जांभई ग
निजले बदलून
कुशी
खिडकीमधुनी
खुणवत होता
चवथीचा चांदवा
ग बाई बाई झोंबतो
गारवा !
रागारागानं
गेले मी कोन्यात
ग
चिंब न्हाऊन
मी पाहिलं ऐन्यात
ग
मनात माझ्या
घुमु लागला
मदनाचा पारवा
ग बाई बाई झोंबतो
गारवा !
आज आला तुम्ही
माझी केली कदर
झाली नजरानजर
घेते लाजून
पदर
खुशाल यावं
जवळी घ्यावं
धरून हात आडवा
ग बाई बाई झोंबतो
गारवा !
|