किती पांडुरंगा
वाहू संसाराचा
भार ?
लक्ष चौऱ्याऐंशींचा
नको आता येरझार
लोखंडाचे गुणदोष
बघे का परिस
लेकराची कासावीस
माहीत आईस !
पाण्यामाजी
तूच देवा, तारीले
पाषाण
ब्रीद तुझे
दीनानाथा, पतितपावन
!
कठीण तो मायापाश
सुटेना कोणास
कपाळीचा टळेनाही
कोणा वनवास
!
अनाथांचा नाथ
तुला बोलतात
संत
काकुळती आलो
आता नको बघु
अंत
कोठे गुंतलासी
राया, कोणाला
ताराया ?
पंढरीच्या राया,
तुझ्या दंडवत
पाया !
|