रे नंदलाला तू छेडू नको
धरुनी पदराला ओढू नको

सांजवेळ झाली घरी जाऊ दे ना
नको बासरीच्या घेऊस ताना
शब्द लाघवी काना बालू नको

अडवू नको रे नभी चंद्र आला
आवरुनी घे ना तुझ्या बाललीला
मला मोहमायेने अडवू नको
 
 
गीत - उमाकांत काणेकर
संगीत - श्रीकांत ठाकरे
स्वर - शोभा गुर्टू
For the printable version of this song, click here.