मैत्रिणींनो
थांबा थोडं
खुशाल मागनं
हसा !
चला इचारु या
येडीला संसार
करशील कसा ?
गोरीपान ही
काया कवळी,
ओल्या हळदीनं
होईल पिवळी
लगीन होता सासरी
जाता जीव होईल
ग पिसा !
पी पी सनई,
तडाम् चौघडा,
पंचकल्याणी
येईल घोडा
त्यावर दोघं
बसा !
अगं मैत्रिणींनो
थांबा थोडं
खुशाल मागनं
हसा !
चला इचारु या
येडीला संसार
करशील कसा ?