पंचतुंड नररुंडमालधर
पार्वतीश आधीं
नमितो ।
विघ्नवर्गनग
भग्न कराया
विघ्नेश्वर
मग गणपति तो
॥
कालिदासकविराजरचित
हें गानीं शाकुंतल
रचितो ।
जाणुनियां अवसान
नसे हें महत्कृत्यभर
शिरीं घेतों
।
ईशवराचा लेश
मिळे तरि मूढयत्न
शेवटिं जातो
।
या न्यायें
बलत्कवि निजवाक्पुष्पीं
रसिकार्चन करितो
॥
|