मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगासी लिंपुनी राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जन्मजन्माचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे
चित्रपट - महानंदा (१९८४)
राग - यमनकल्याण (संगीत यात्रा)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.
  Shanta Shelke
  Shanta Shelke