परम सुवासिक
पुष्पें कोणी
चातुर्यें गुंफिती
नारी
सुगंध तैलें
वासित करिती
शय्यावस्त्रें
धरुनि करीं
नानापरिचे विडे
मनोहर तबकांमध्यें
कोणि भरी
अंगराग ते तयार
करुनी ठेविति
शेजेशेजारीं
खिडक्यांचे
वाळ्याचे पडदे
भिजवुनि कोणी
गार करी
गुलाबपाणी थंड
करोनी शिंपित
कोणी गच्चिवरी
सर्व तयारी
नीट कराया दक्ष
असति जन किती
तरी
वाटे मज मंदिर
हें करिलचि
वैकुंठाची बरोबरी
॥
|