भरे मनात सुंदरा,
तुझीच मूर्ति
श्यामला
छंद लागला जिवास,
धुंद जो करी
मला
कोकिळेस लाभली
सुरम्य गीत-माधुरी
गौरगाल भूषवी
सुरेख तीळ साजरा
लाभता तुझ्या
परी सुकांत
कृष्ण-सुंदरी
म्हणेन मी नको
मला, अप्सरा
मनोहरा
खेद न करि श्यामले
! सावळाच रंग
खुले
पहा, निशाच
शोभवी सतेज
चंद्र हासरा
|