ये झणिं ये
रे । माघारी
॥
क्षणभर वळुनीं,
बघ मम नयनीं,
मूर्ति अपुली
।
कुठवर एकलि
वाट पाहू ।
तुजविण राहू
।
विसरुनि जाशिलही
। नवथर
प्रीत खुळी
।
जा घेउनिया
सांगाती रे
हे मन माझे
॥
तळमळले नयन
तुझे जरि ।
मजला कधी
पहाया ।
सुखविन तुजला
। नकळत
रे राया ।
येउनिया स्वप्निं
तुझ्या सखया
॥
|