सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥

गोदातटीची पंचवटी ती, आठवते मज पर्णकुटी ती
प्रिय रघुनंदन, प्रिय जानकी, एकामेका जवळ सारखी
कपोत युगुलापरी लाभला रात्रंदिन सहवास ॥

येथ घेरिती तया प्रजाजन
दुरावती मज जानकी-जीवन
भरजरी वसने, रत्नकांचने, असह्य मज ही रत्नभूषणे
रावणसे हे, रामी परका, कारण हो विरहास ॥
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वासुदेव भाटकर
स्वर - ज्योत्सना भोळे
नाटक - भूमिकन्या सीता (१९५८)
For the printable version of this song, click here.