नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥
विवाह करुनि मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला ॥
धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला ॥
परमेशाच्या ऐशा लीला । कविकृष्ण गात विस्मयकारा ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
गोविंदराव टेंबे
स्वर
-
???
नाटक
-
संगीत मानापमान (१९११)
राग
-
हमीर
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
नांदी