दे हाता या शरणागता ॥
मदविलासित नदगता पंकयुता मुखमलिना धना हो त्राता ॥
संपदा चपलचरणा । आपदा भोगि नाना । परत ये पद्मसदना ॥
कुवलय तव मुख तिला; अजि कमला विनवि तुला, मला घे आतां ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
गोविंदराव टेंबे
स्वर
-
छोटा गंधर्व
नाटक
-
संगीत मानापमान (१९११)
राग
-
मिश्र काफी
(नादवेध),
आनंद भैरवी
(संगीत-सरिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
’येरानासामी’ या कर्नाटकी चालीवर