जाण जरि शत्रूला, जामात नेमिला ।
वंशतरु जाळिला मीच माझा ॥
देवयानी मला, पुत्र जणु एकला ।
काव्यरस जन्मला, गीतराजा ॥
अभिमान हा दिसे, तापसाला पिसें ।
जीव परि तो असे, आप्तकाजा ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
, हिराबाई बडोदेकर
स्वर
-
विनायकबुवा पटवर्धन
नाटक
-
संगीत विद्याहरण (१९१३)
राग
-
शंकरा
(मूळ संहिता)
ताल
-
झपताल
चाल
-
’निर्धना जी वरी’