ज्यावरिं मीं विश्वास ठेविला ।
समजे प्राणप्रिय जो मजला ।
भजलों देवापरि मी ज्याला ।
तो ऐसा फिरला ॥

योग्य मी नव्हतों तद्भगिनीला ।
द्यावी होती अन्य नृपाला ।
कैसा मम वैरी सन्मानीला ।
हें दु:खद मजला ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
चाल - ’गजानना दे दर्शन’
For the printable version of this song, click here.