"शशिकुलभूषण
सदया ।
मत्प्राणेश्वर
विजया ।
विनवी ही तव
जाया ।
मान्य कराया
॥
अर्पियली ही
काया ।
तव चरणीं पतिराया
।
ठाउक असुनी
हें सखया ।
त्यजली कां
माया ॥
मज दुर्योधनाहातीं
। द्याया
निश्चय करिती
।
बंधू ते नायकिती
। बघतां
अंत किती ॥
समयीं नाहीं
आलां ।
देइन मी प्राणाला
।
धाडियलीसे मला
। खूण तुम्हांला
॥"
रिपु नेतां
भार्येसी ।
सुचली यात्रा
कैसी ।
याहुनि होउनि
संन्यासी ।
न्या मज
सेवेसी ।
|